शुक्रवार, १ सप्टेंबर, २०१७

Fundamental analysis - Price to book ratio

P/B ratio ( price to book ratio )
Formula
Price to book ratio = Market price of share / book value .
यासाठी अगोदर book value म्हणजे काय ते बघू ,

ज्याप्रमाणे वर्षभरात कंपनीच्या शेअरच्या बाजारातल्या किंमतीमध्ये वाढ होते त्याच प्रमाणे  वर्षाच्या शेवटी annual report मध्ये Book Value per share मध्ये वाढ दिसने आवश्यक असते .
जर कंपनीचा सेल्स समाधानकारक असूनपण कंपनीच्या book value मध्ये अपेक्षित वाढ दिसत नसेल तर मॅनेजमेंटला शेअर होल्डरची कदर नाहीं किंवा मॅनेजमेंट स्वार्थी प्रवृत्तिचे असून होणारा नफा प्रमोटर इतर मार्ग वापरुन खाउन टाकतोय किंवा कंपनी मोठी करायची  प्रमोटरची मानसिकता दिसत नाहीं  अस समझावे .
.
Book value मध्ये EPS प्रमाणेच दर वर्षी सरासरी १२.५%  चक्रवाढ दराने ( CAGR = compounding annual growth rate ) वाढ व्हायला पाहिजे .
CAGR example -
March 2013 = Book value 100rs
March 2014 = Book value  112.50rs
March 2015 = Book value  126.56rs
March 2016 = Book value  142.38rs
Book value मध्ये अशाच प्रमाणात वाढ व्ह्यायला पाहिजे असबकही नियम नाही , पण वर्षानुवर्षे book value मध्ये सातत्याने वाढ दिसली पाहिजे हा महत्त्वाचा मुद्दा आहे ,
.
आता मूळ मुद्द्यावर बोलू ,
एखाद्या स्टॅाकची सध्याची बाजारातली किंमत बूक व्हॅल्यूपेक्षा किती पट जास्त आहे हे प्रमाण दर्शवणारा रेशो म्हनजे P/B ratio .
Formula
P/B = CMP / BOOK VALUE
समझा एखादी xyz नावाची कंपनी आहे . तिची एका शेअरची book value 100rs आहे. आणि एका शेअरची सध्याची बाजारातली कि़ंमत 300rs आहे .
तर
P/B ratio(3) = CMP(300)/book value(100)
.
P/B ratio = 3
म्हनजे गुंतवणूकदार वरिल कंपनीचा एक शेअर विकत घेण्यासाठी मूळ किंमतीपेक्षा ३ पट जास्त पैसे मोजतोय .
.
शेअर बाजारात काय करायला पहिजे यापेक्षा काय नाही केल पाहिजे ही गोष्ठ महत्त्वाची आहे .
बाजारात नफा कमावने ही गोष्ठ तर खुप पुढची झाली . पण नफा कमावण्यापुर्वी आपण गुंतवलेल भांडवल सुरक्षित असने आवश्यक आहे .
.
लक्षात घ्या ,
जेव्हा बाजारात मंदी येते म्हनजेच करेक्शन येते तेव्हा याच high P/B असलेल्या स्टॅाकचा पहिला बळी जातो .
.
आता विषय हा आहे कि आपण गुंतवणूक करत असलेल्या कंपनीचा P/B रेशो नक्की किती असला पाहिजे . जेनेकरुन आपल भांडवल सेफ राहिल..
P/book ratio किती असला पाहिजे याबाबत जसे मी मागे PE ratio बद्दल सांगितल तसच P/B ratio साठी सुद्धा प्रत्येक सेक्टरचे वेगवेगळे पॅरामीटर्स आहेत .
ते तुम्ही एकदा स्वत: डोळ्याखालून घाला.
.
काही सेक्टरमधल्या कंपन्यांचे P/B ratio खुप high असतात .
तर काही सेक्टरमधल्या  कंपन्यांचे P/B ratio खुप low असतात .
तर काही सेक्टरमधल्या कंपन्यांचे p/b ratio मिडिअम असतात .
म्हनजेच प्रत्येक सेक्टरमध्ये आपल्याला वेगवेगळे P/B ratio पहायला मिळतात .
.
मी गुंतवणूक करताना अगोदर सेक्टर निवडतो . नंतर निवडलेल्या सेक्टरमल्या top 5 productivity असलेल्या किंवा fundamentally good कंपन्यांमधून low P/B कंपनी निवडतो .
Fundamentally good म्हनजे माझ्या लेखी सेक्टरमधली सर्वात मोठी कंपनी नाही .
जी कंपनी सातत्याने वाढत आहे ती कंपनी माझ्यासाठी fundamentally good कंपनी असते .
.
आणि समझा एखाद्या कंपनीचा P/B ratio जरी high असेल आणि त्या कंपनीची quarterly yearly growth चांगली असेल तर मी growth करणार्या कंपनीचा P/B ratio जास्त असला तरीसुद्धा मी High P/B असलेला stock निवडतो .
जरी आपण एखादी low P/B असनारी पण तिचा quarterly yearly growth LOW असणारी कंपनी निवडली तर आपले पैसे वाढन्याऐवजी कमीच व्हायचे चान्सेस जास्त असतात .
.
याउलट मला माझे गुंतवलेले पैसे वाढलेले बघायला आवडतात . त्यामुळे निरंतर वाढ करणार्या कंपनीला मी प्राधान्य देतो .
माणसाने नेहमी लंगड्या घोड्यावर पैसे न लावता पळनार्या घोड्यावर पैसे लावले पाहिजेज.
.
त्यामुळे कंपन्यांचे fundamental बारकाइने पाहिल्यास अस लक्षात येइल कि जनरली ज्या कंपन्यांच fundamental चांगल आहे त्या कंपनीच्या स्टॅाकला मागनी वाढल्यामुळे शेअरची किंमत वधारते .
.
मी गुंतवणूक करताना दोन वर सांगितलेल्या पॅरामीटर्सव्यतिरिक्त अजुन दोन पॅरामीटर्स बघतो .
१) एखाद्या कंपनीचा P/B ratio कमी असेल तर मी तो स्टॅाक undervalued आहे किंवा तो स्टॅाक इतक्या स्वस्तामध्ये मिळतोय याच अर्थ त्यात काहीतरी खराब आहे अस समझतो आणि त्या दृष्टिने स्टॅाकच analysis करुन त्या स्टॅाकचा P/B ratio इतका स्वस्त का आहे यामागची करणे शोधून काढतो आणि मगच   त्या कंपनीमध्ये गुंतवणूक करतो . कंपनी का growth rate कमी असला की इन्वेस्टर्स अशा कंपनीकड़े सहसा फरकत नाहीत म्हणुन low ग्रोथ असलेल्या कंपन्यांच pb ratio कमीच असतो , आशा कंपनी मधे इन्वेस्टमेंट केली तर पैसे बूडू शकतात .
२) ज्याप्रमाणे कंपनीच्या शेअरच्या किंमतीमध्ये वाढ होते त्याच प्रमाणे कंपनी वर्षाच्या शेवटी annual report मध्ये Book Value मध्ये वाढ करत असते हे मी मागच्या टॅापिकमध्ये सांगितलय .
कंपनीच मागील ४-५ वर्षांच financial statements तपासून P/B ratio वाढतोय कि कमी होतोय हे ट्रॅक केल पाहिजे . म्हनजे आपल्याला लक्षात येइल कि आपण कुठल्या दिशेला चाललोय . ( this information available in moneycontrol . At ratio analysis section. )
३) रिटेल इन्वेस्टरने सुरवातीला कटाक्षाने सातत्याने वाढनारी ( मोठी नाही ) म्हनजेच good quarterly yearly growth असनारी आणि जिचा P/B ratio 5 पेक्षा कमी असलेल्या कंपनीमध्ये investment करावी .
Evergreen stock असेल आणि कंपनीला सक्षम स्पर्धक नसेल तर अशा कंपनीमध्ये तुम्ही 5 पेक्षा जास्त P/B ratio असला तरीही गुंतवणूक करु शकता.
.
आपल्याला काही कंपन्या अशाही पहायला मिळतात कि ज्यांचा P/B ratio अगदी 5 , 10 ,15 ते अगदी 45  च्या आसपास असतो .
या कंपन्यांच fundamental आणि growth rate अतिशय उत्तम असल्यामुळे गुंतवणूकदार अशा स्टॅाक्सवर तुटून पडतात .
Peter Lynch च्या मते high pb असलेल्या स्टॉक मधे इन्वेस्टमेंट केली तर आपल्याला multiple return मिलू शकणार नाही , कारण खरा फायदा हा खरेदी करतनाच जर स्वस्त किंमती मधे खरेदी करण्यात असतो ,
तुम्ही जर high pb स्टॉक्स खरेदी केलेत तर तुम्ही सुरुवतीला खरेदी करतनाच खुप जस्ट पैसे मोजलेले असतात ,

अशा स्टॅाकला watch list मध्ये add करुन ठेवायचा .
आणि नंतर स्टॅाकची  किंमत ( CMP ) कमी झाली किंवा वर सांगितल्याप्रमाणे कंपनीने yearly results मध्ये book value मध्ये वाढ केली तर हाच वाढीव P/B ratio अपोआप कमी होतो . त्यावेळेच स्टॅाक लगेच buy करायचा .
.
Peter Lynch म्हणतात की सातत्याने वाढणाऱ्या पण त्यातल्या त्यात कमी price to book ratio असलेल्या कंपनी मध्ये इन्व्हेस्टमेंट करा.

सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

Fundamental analysis - PE ratio

P/E ratio ( Price to earning ratio )
Formula
P/E ratio = Price / EPS
Example
P/E ratio(10rs)= Price(100rs)/EPS(10rs)
.
समझा एखादी xyz नावाची कंपनी आहे आणि त्या कंपनीचा एक शेअर सध्या १००/- रुपयांना ट्रेड होतोय . आणि त्या कंपनीचा EPS 10rs आहे म्हनजेज ती कंपनी १०० रुपयांच्या एका शेअरवर वर्षभरात १० रुपये शुद्ध नफा कमावते .
याचा अर्थ असाही होतो कि १० रुपये वार्षिक फायद्यासाठी गुंतवणूकदार १०० रुपये म्हनजेच होणार्या संभाव्य फायद्याच्या दहा फट पैसे गुंतवणूक करतात .
सोप्प्या भाषेत सांगतो..
कंपनी जितका शुद्ध नफा कमावते त्याच्या किती पट पैसे गुंतवतो ते प्रमाण म्हनजेच pe ratio ..
गुंतवणूकदारांचा एक वर्ग असा आहे कि त्यांच कल low pe stocks कडे असतो . कारण pe ratio जेवढा कमी तेवढा तो स्टॅाक स्वस्त असा जनरली सगळ्यांच समज असतो .
हा समज असायलाच पाहिजे . पण एखादा स्टॅाक इतक्या कमी pe ratio वर का ट्रेड होतो यामागे पण बरिच कारणे असतात .
.
गुंतवणूकदारांचा दुसरा एक वर्ग असा आहे कि त्यांच कल  high pe stock कडे असतो .
त्या लोकांचा असा logic असत कि मार्केट मध्ये या high pe stock ने स्वतःला सिद्ध केलय . कंपनीचा growth rate चांगला आहे आणि एकंदरीत त्या कंपनीने गेल्या काही वर्षांत अतिशय उत्तम कामगिरी करुन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केलाय आणि मार्केट मध्ये पत कमावली आहे .
.
तस पाहिल तर प्रत्येक सेक्टरच pe ratio वेगवेगळे असतात .
जस कि power sector मधल्या  स्टॅाक्सचा pe ratio low म्हनजेच सरासरी  10 ते 15 असतो .
यामागच कारण म्हनजे या सेक्टर मध्ये गुंतवणूकींसाठी पैसा भरपूर लागतो . त्यामुळे या सेक्टरमधल्या कंपन्यांवर कर्ज भरपूर असते .
याशिवकय वीजेचे दर सरकार ठरवत असल्यामुळे या सेक्टरमधल्या कंपनी स्वतःच वीजेचे दर वाढऊ किंवा ठरऊ शकत नाहीं परिणामी कंपन्यांच्या EPS म्हनजेच कमाईमध्ये मध्ये अपेक्षित झटपट वाढ होत नाहीं .
.
FMCG सेक्टरमधल्या कंपन्यांचा PE ratio high असतो .
FMCG ( fast moving consumer goods रोज वापरल्या जाणार्या वस्तु )
यामागच कारण म्हनजे या कंपन्यांच्या मालाला खुप जास्त असतो . या कंपन्याच्या उत्पादनच्या किंमती ठरवण्यावर सरकारच जास्त control नसत .
.
सेक्टरमधल्या सगळ्या स्टॅाकच्या Pe रेशोंची सरासरी घेउन प्रत्येक सेक्टरचा एक industry PE काढला जातो.
गुंतवणूकदार निवडलेला स्टॅाक industry pe ratio बरोबर तुलना करतात आणि एकाच सेक्टरमधल्या ४-५ कंपन्यांची एकमेकांबरोबर तुलना करुन low pe stock निवडतात .

गुरुवार, २४ ऑगस्ट, २०१७

Fundamental analysis - EPS


     EPS म्हनजे कंपनी एका शेअरवर किती निव्वळ नफा कमवते . हा एक रेशो आहे . हा रुपयांमध्ये मोजतात . म्हनुन याच्या पुढे rs लावलेल असत . जस कि 5rs , 18rs .
Formula
EPS = Net profit / total number of shares .
.
हा खुप बेसिक आणि तेवढाच महत्त्वाचा रेशो आहे . या रेशोवरच इतर पुढचे सगळेच रेशो प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे अवलंबून असतात .
कंपनीचा EPS ज्या गतिने वाढतो त्या गतिने कंपनीची वाढ होते .
गुंतवणूकदार ज्या कंपनीचा EPS  सातत्त्याने वाढत असतो त्या कंपनी मध्ये गुंतवणूक करायला इच्छुक असतात . अशा वेळेस मागनी वाढल्यामुळे स्टॅाकची किंमत वाढते .
        आणि एखाद्या कंपनीचा EPS मध्ये वाढच न होता तो  स्थिरच राहिला असेल किंवा EPS कमी झाला असेल तर गुंतवणूकदार त्या स्टॅाकमधून पटापट वाहेर पडतात . मग मागनी कमी झाल्यामुळे स्टॅाक पडतो .
.
माझ्या मते EPS मध्ये दर वर्षी सरासरी १२.५%  चक्रवाढ दराने ( CAGR = compounding annual growth rate ) वाढ व्हायला पाहिजे .
१० वर्षांपूर्वी ५०/- रुपयांना असलेले काही स्टॅाक आज १५००/- रुपयांना ट्रेड होत आहेत . यामागे Consistent EPS Growth हेच कारण आहे .
.
CAGR example -
March 2013 = Eps 100rs
March 2014 = Eps 112.50rs
March 2015 = Eps 126.56rs
March 2016 = Eps 142.38rs
.
EPS मध्ये दर वर्षी अशा प्रकारे वाढ व्हायला पाहिजे . Fundamental analysis करताना हा एक महत्वाचा पॅरामीटर पाहिला जातो...

रविवार, २० ऑगस्ट, २०१७

different between Investor and trader .

शेअर बाजारात प्रामुख्याने तीन प्रकारांत व्यवहार केले जातात .
१) Delivery ( यालाच Equity म्हनजेच समभाग म्हनतात )
२) Future and option
३) intraday trading
.
जे लोक Equity मध्ये व्यवहार करतात त्यांना गुंतवणूकदार ( investors ) म्हनतात . यांचा गुंतवणूकीकडे पाहन्याचा दृष्टिकोण दीर्घकालिक असतो . हे लोक एकदा स्टॅाक घेतला कि वर्षानुवर्षे तो जवळ ठेवतात .
सोप्प्या भाषेत सांगायच झाल तर , एका शेतकर्याने बाजारातून एक गाय खरेदी केली . तो तिला घरी घेउन आला . त्याने त्या गाईला काही वर्षे सांभाळल . तिचे दूध काढून त्यापासून वेगवेगळे पदार्थ बनउन विकले आणि  नंतर काही वर्षांनंतर बाजारभावानुसार गाईची किंमत वाढल्यानंतर तिला विकन टाकले .  Equity shares खरेदी केल्यानंतर आपण कंपनीच्या नफा , तोटा आणि भरभराटीमध्ये भागीदार असतो .
.
दुसरा आणि तिसरा पर्याय म्हनजे intraday trading आणि future and option हे अतिशय जोखिमवाले असतात . यात कमी वेळेत झटपट पैसे कमवता येतात पण बर्याचदा ठरवलेले अंदाज चुकीचे ठरल्यामुळे यात तोटा होतो .
जे लोक Future and option आणि intraday trading मध्ये व्यवहार करतात त्यांना व्यापारी  ( trader ) म्हनतात . हे लोक एक दिवसात किंवा एक महिन्यात घेतलेला माल विकून प्रॅाफिट कमउन बाहेर पडतात .
म्हनजेच एखाद्या व्यापार्यासारखे यांचे व्यवहार असतात . यात आपला ब्रोकर आपल्याला काही माल खरेदी करण्यासाठी काही पैसे उधार देतो . याला exposure म्हनतात . आपण exposure घ्यायय कि नाहीं घ्यायच किंवा घेतल तर किती घ्यायच हे आपल्या हातात असते .
म्हनजेच एखादा व्यापारी बाजारातून सकाळी एक गाय विकत घेतो . बाजारा बंद होइपर्यंत घेतलेल्या किंमतीपेक्षा थोड्या जास्त किंमतीमध्ये तो गाय विकून टाकतो . किंवा तो त्या गाईला घरी घेउन जातो . स्वतःच्या गोठ्यामध्ये महिनाभर बांधतो आणि महिनाभरात एखाद चांगल गिर्हाइक मिळाल तर फायद्यामध्ये विकून टाकतो .
Intraday trading मध्ये व्यवहार एका दिवसांतच आणि future and option मध्ये एक महिन्याच्या कालावधिमध्ये पुर्ण करावा लागतो . जर आपण तो व्यवहार पुर्ण केला नाही तर आपला ब्रोकर तो व्यवहार मिळेल त्या किंमतीमध्ये पुर्ण करुन त्यांच ब्रोकरेज आणि उधार दिलेले पैसे वसूल करतो .
.
Equity मध्ये intraday trading आणि future and option पेक्षा जोखिम कमी असल्यामुळे equity मध्ये गुंतवणूक करणे जास्त फायद्याचे ठरते .
intraday trading आणि future and option मध्ये अंदाज चुकले तर आपले संपूर्ण भांडवल बुडण्याची दाट शक्यता असते . equity मध्ये जरी तोटा झाला तरी इतक्या प्रमाणात होत नाहीं . Equity मध्ये हळूहळू पैसा वाढतो .
 त्यामुळे नवीन गुंतवणूकदारांनी intraday आणि। Future and option च्या नादाला लागू नये .

गुरुवार, १७ ऑगस्ट, २०१७

नवीन गुंतवणूकदारांनी सुरुवात कशी करावी..??

अगोदर Demat account खोला . मार्केटमध्ये involved व्हा . पाण्याच्या बाहेर उभ राहून पोहायला शिकता येत नाहीं . त्यासाठी पाण्यात पडाव लागत . तसच शेअर मार्केटच असत . तुम्ही एकदा D-mate account उघडल कि सुरवातीला वेगवेगळ्या शेअर्सचे भाव पहाल . तुम्हाला शेअर्सचे विगवेगळे रेशो पहायला मिळतील . यातुन तुमची जिज्ञासा वाढेल . सुरवातीचे काही दिवस मार्केटच शक्य तितच नुसत निरीक्षक करा आणि त्याचबरोबर माहितीसुद्धा गोळा करा . आजच्या जगात प्रत्येक क्षेत्रातील माहितीचा प्रचंड साठा उपलब्ध आहे . You tube , social media , Newspaper , blogs वाचा . सेमिनार अॅटेन्ड करा .
शेअर मार्केटमधल्या जानकार लोकांच्या आवर्जुन भेटी घ्या . अशा लोकांना भेटल्यावर तुम्हाला प्रेरणा मिळेल . तो करु शकतो तर मी का करु शकत नाहीं अस वाटेल .
.
पण आपली मराठी माणसं खुप हरामखोर असतात . कुणाला चार चांगल्या फायद्याच्या गोष्ठी कधीच सांगणार नाहीत . स्वतः शेअर बाजारात गुंतवणूक करतात पण हे शेजारी राहणार्याला आणि  एकत्र काम करणार्याला सुद्धा कळून देत नाहींत . कोणी माहिती विचारली तर निगेटिव्ह उत्तर देतात . तुम्हाला मार्केटमध्ये यायला रोकतात . असे लोक सुद्धा तुम्हाला भेटतील . यावर सुद्धा एक उपाय आहे .
            ज्ञान मिळवण्यासाठी निर्लज्ज आणि लोचट बना . मी अस का म्हणतोय ..??
मार्केटमध्ये अंधाधुंद उतरुन घामाचा पैसा गमावण्यापेक्षा हे कधीही चांगल .
 मार्केटमध्ये प्रत्येक चुकीला शिक्षा आहे . ती शिक्षा म्हनजे आर्थिक नुकसान .
ज्ञान खुप पवित्र आहे . आपण पैशाची नाहीं तर ज्ञानाची भीक मागतोय . त्यामुळे तुमचा ego बाजूला ठेवा .
मी जेव्हा अभ्यासाला सुरुवात केलेली तेव्हा मला याच लोकांनी यात पडू नकोस असा सल्ला दिलेला . आज तेच लोक मला येउन काही गोष्ठी विचारतात .
.
माहिती गोळा करत असताना तुम्हाला मार्केटमधल थोडफार ज्ञान आल्यानंतर चांगल्या दर्जाच्या आणि मोठ्या कंपन्यांच्या शेअर्समध्ये अगदी थोडेसे पैसे गुंतवणूक करा .
यातूस काय होइल ..??
यामागच प्रयोजन काय..??
ज्यावेळेस तुम्ही बाहेर असता तेव्हा तुमच ज्ञान वाढन्याची एक सीमा असते . पण तुम्ही जर पैसे गुंतउन involved झालात तर तुमच ज्ञान जास्त लवकर आणि वेगाने वाढू शकत .
सांगायच ताप्तर्य हेच कि , जस आपण जीमचे एकदम पैसे भरले कि झक मारत जीमला जातो . तसच तुम्ही जर एकदा पैसे गुंतवले कि तुमच्यावर एक प्रकारची जबाबदारी पडते . तुम्ही social media न बघता कंपन्यांचे शेअर्सचे भाव बघनार.. WhatsApp चे forwarded मेसेजेस न वाचता तुम्ही News hunt वर उद्योग व्यवसायाच्या आणि अर्थव्यवस्थेच्या बातम्या वाचनार .
.
गाडी शिकताना आपण एकदम टॅाप गिअरला १२० च्या स्पीडने गाडी चालवत नाही . सुरवातीला आपल्या गाडीचा स्पीड २०km/h असतो . नंतर हळूहळू आपल्याला confidence येतो . आपली भिती मरते . मग आपण हातचलाखीने गिअर चेंज करायला शिकतो . हे शिकताना ६ महिने तरी जातातच . सेम स्टॅाक मार्केट मध्ये पण असच असत . फक्त सुरुवात अतिशय कमी पैसे गुंतवणूक करा . सुरवातीला तुम्हाला नफा कमावायचा नाहीये , तर तुम्हाला या सुरवातीच्या प्रवासामध्ये टेस्ट मॅच मधल्या बॅट्समनसारख टिकून रहायच आहे .
लक्षात घ्या ,
तुम्हाला सुरुवातीला तुमच्या भितीवर विजय मिळवण्यासाठी टिकून रहायचय .
इथ सुरवातीलाच जर तुम्हाला झटका बसला तर तुम्ही परत आयुष्यात स्टॅाक मार्केटच तोंडसुद्धा बघणार नाहीत .

सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

शेअर मार्केटमधील पारदर्शकता...

शेअर बाजारात पैसे बुडतात का..??
आमचे पेसे कोणी खाल्ले तर..??
आम्ही गुंतवणूक केलेली कंपनीच बुडीत निघाली तर..??
.
D-MATE अकाउंट उघडण्याअगोदर सगळ्याच गुंतवणूकदारांच्या मनात हीच शंका असते . एका स्मार्ट इन्वेस्टरच्या  मनात अशा शंका यायलाच हव्यात . आपण घाम गाळून कमावलेला पैसा गुंतवण्यापुर्वी  आपण दहा वेळेस विचार केला पाहिजे .
माझ्याही मनात हीच शंका होती .
.
तुम्ही रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करा , बिल्डर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतिने चुना लावतोच .
तुम्ही सोने खरेदी करा , सोनार विकत घेताना मजुरीचे वाढिव पैसे घेतो . तेच सोने तुम्ही सोनाराकडे विकायला जा , सोनार मजबूत घट लावतो .
गुंतवणूकदारांवर एवढा अन्याय होतो तरी पण गुंतवणूकदार एवढी फसवणूक होउन सुद्धा काहीच करु शकत नाहीं .
इथे गुंतवणूकदार पुर्णपणे हतबल असतो , कारण कायदे आणि सरकारच यांवर इतक ठिक नियंत्रण नसत .
.
आपल्या देशातील सर्व बॅंकावर आणि बॅंकेंच्या व्यवहारांवर रिजर्व बॅंक अॅाफ इंडियाचे ( RBI ) नियंत्रण असते .
RBI ला एखाद्या बॅंकेबाबत काही अक्षेपार्ह निदर्शनास आले तर RBI कडून संबंधित बॅंकेवर तत्काळ कारवाई केली जाते .
एखादी बॅंक तोट्यात असेल तर RBI गुंतवणूकदारांच्या पैशाचा विचार करुन त्या बॅंकेचे दुसर्या एखाद्या बॅंकेत मर्जर करते .
.
तसच शेअर मार्केट मधल्या प्रत्येक कंपनीवर आणि प्रत्येक व्यवहारावर सेबी ( SEBI ) चे नियंत्रण असते .
सेबी म्हनजे काय..??
SEBI म्हनजे Security And Exchange Board Of India... ही एक पुर्णपणे सरकारी नियंत्रण असणारी संस्था आहे .
शेअर बाजारात कंपनी लिस्ट होण्यापुर्वी सेबी कडून त्या कंपनीचे पुर्णपणे Audit केले जाते . कंपनीची पत पाहूनच सेबी कडून कंपनीला शेअर मार्केटमध्ये सामाउन घेतले जाते .
कंपनीला त्यांचे सगळे Audit report , profit loss statement , balance sheet , annual report , quarterly report हे सगळे महत्त्वाचे डॅाक्युमेंट्स गोपनीय न ठेवता ते सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सहज उपलब्ध व्हावेत या हेतूने जनतेसमोर सादर करावे लागतात .
एक प्रकारे सेबीने कंपन्यांना एवढे कडक आणि जाचक नियमांनी बांधून ठेवले आहे कि कंपनीने प्रमोटर्स , डायरेक्टर किंवा मालक आपल्यासारख्या शेअर होल्डरचे नुकसान होइल असा कोणताच निर्णय घेउ शकत नाहीं . शेअर बाजारातल्या सर्व कंपन्यांच्या व्यवहारांवर सेबी चे नियंत्रण असते . त्यामुळे शेअर बाजारात लबाडी गैरव्यवहार होण्याचे चान्सेस शून्य टक्के असतात . यापेक्षा अजुन किती पारदर्शकपणा हवा..??
.
कंपनी लिस्ट झाल्यानंतर देखिल सेबी कडून कंपन्यांचे वेळोवेळी Audit , enquiry आणि investigation चालूच असते . त्यामुळे  कंपनीच्या डायरेक्टला काही गडबड घोटाळा आणि टॅक्स चोरी वगैरे करता येत नाहीं . जर कुठली कंपनी SEBI ला दोषी आढळली तर गुंतवणूकदारांच्या पैशांचा विचार करुन SEBI कडून संबंधित कंपनीने सगळेच आर्थिक व्यवहार आणि अकाउंट सील केले जातात .
.
शेअर बाजारात पैसे बुडतात का..??
आमचे पेसे कोणी खाल्ले तर..??
तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे आणि शंका दूर झाल्या असतील .
.
आता दुसरी शंका ,
आम्ही गुंतवणूक केलेली कंपनीच बुडीत निघाली तर..??
.
कंपनी अशी एका रात्रित बंद पडत नसते . कंपनी बंद पडन्याची एक दिर्घकाळाची प्रक्रिया असते .
कंपनी बंद पडन्यामागे प्रामुख्याने दोन कारने असतात .
दिवसेंदिवस वर्षानुवर्षे विक्री कमी होउन कंपनीना शुद्ध नफ्यात घट होत असल्यावर आणि कंपनीच्या कर्जामध्ये सतत वाढ होत असल्यास अशा कंपन्या बंद पडायची दाट शक्यता असते .
आपण अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची नाहीं . जरी आपण गुंतवणूक केलेली कंपनी अशा प्रकारची असेल तर आपल्याला तिच्यातून योग्य वेळीच बाहेर पडता देखिल येत .
.
मी वरती सेबी ने शेअर मार्केटमधल्या कंपन्यांना त्यांची सर्व माहिती Quarterly results , annual reports , Balance sheet , Profit loss statment मध्ये लोकांसाठी खुली ठेवने बंधनकारक आहे . आपण या गोष्ठींची पाहनी करुन कंपनीची स्थिती समझाउन घेउ शकतो .
आणि जरी तुमच्या मनात अशी शंका असेल कि कंपनीने financial statements मध्ये काही चुकीची माहिती टाकून गडबड घोटाळा केला आहे . तर अशा वेळी आपल्या लक्षात येण्यापुर्वीच सेबी संबंधित कंपनीवर कडक कारवाई करते . ही कारवाई काही साधीसुधी नसते . सेबी ने काही कंपन्यांना करोडो रुपये दंड भरायला लावला आहे .
.
शेअर बाजारात ७००० कंपन्या लिस्टेड आहेत . आणि आपल्यावर कोणाच बंधन किंवा बळजबरी नाही . आपण आपल्याला हव्या त्या कंपनीची निवड करु शकतो . आपण हव तेव्हा कंपनीमधून बाहेर पण पडू शकतो .
स्टॅाक मार्केट मध्ये फायदा कमावन्याच्या गोष्ठी खुप लांबच्या झाल्या . त्यापुर्वी आपण आपल भांडवल सुरक्षित ठेवल पाहिजे .
त्यासाठी नेहमी ज्या कंपनीच बिजनेस मॅाडेल आपल्याला सहज कळत , ज्या कंपन्यांची विक्री , नफा चांगला आहे , समाजामध्ये पत चांगली आहे आणि ज्या कंपनीवर कर्ज आजिबातच नाहीं किंवा कमी आहे अशा चांगल्या कंपनीची गुंतवणूकीसाठी निवड करावी .

शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

मला समझलेल शेअर मार्केट...

शेअर बाजार खरच एक जुगार आहे का ..?? शेअर बाजार म्हंटल कि मराठी माणूस चार हात लांबच उभा राहतो . पण तिकड गुजरात मध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये एकाचे तरी D MATE ACCOUNT असते . तिथल्या लहान लहान पोरांना अगदी लहानपणापासूनच मार्केटचे धडे दिले जातात . दोन शेजारच्याच राज्यामाधल्या लोकांच्या मानसिकतेमध्ये इतका विरोधाभास का..??
अस काय आहे कि जे गुजराती लोकांना मार्केटमध्ये दिसत पण ते मराठी माणसाला दिसत नाही किवा मराठी माणूस ते समझून घेण्याची मानसिकता ठेवत नाही .
असो ,
शेअर बाजाराला जुगार म्हनणारे दोन वर्गातले लोक आपल्याला पहायला मिळतात .
.
पहिला वर्ग असा कि ज्यांनी कधी शेअर बाजाराच तोंडदेखील पाहिलेल नाहीं असा . शेअर बाजार नक्की चालतो तरी कसा याबाबत यांना शून्य ज्ञान असत .
हे लोक लहानपणापासून वाडवडिलांच्या तोंडून आणि इतर अज्ञानी लोकांकडून ऐकत आलेल्या ऐकीव माहितीच्या आधारे आपल मत मांडत असतात . जेव्हा जास्त संख्येने लोक एखाद्या गोष्ठीच्या समर्थनार्थ किंवा एखादा गोष्ठीविरुद्ध एकत्र आले कि एक भक्कम जनमत तयार होत आणि आपण एवढे सगळे लोक बोलतायेत तर नक्कीच ते खर बोलत असतील यावर शिक्कामोर्तब करतो . आपल्याकडे एक अलिखित सिद्धांत आहे . लोक म्हनात म्हनुन एखादी गोष्ठ खरी आणि लोक म्हनतात म्हनुन एखादी गोष्ठ खोटी यालाच आपण सर्टिफ़िकेट समझतो .
.
अतिशय ज्ञानी आणि तज्ञ लोकांनासुद्धा हा अज्ञानी समुदाय वेडा ठरऊ शकतो हा भाग वेगळा .
कुठलाही अभ्यास न करता केवळ लोकमतावर एखाद्या सिद्धतेपर्यंत पोहचने हे चित्र काही बरोबर दिसत नाही . जे लोक अकाउंट फिल्डमधले आहेत आणि ज्यांना उद्योग धंद्या व्यापारातल बर्यापैकी कळत अशा अभ्यासू लोकांनी अभ्यासू पद्धतिने चिकित्सा करुन शेअर मार्केट जुगार आहे अस म्हंटल तर मी यावर सहमत असेल . पण या क्षेत्राबाबतीत अज्ञानी लोकांनी मांडलेल्या सिद्धतेला मी कधीच मान्यता देणार नाही .
अज्ञानी लोक शेअर बाजाराला जुगारच म्हनतील आणि शिकले सवरलेले लोक बाजारातल्या जोखिम आणि अनिच्छिततेवर भाष्य करतीत .
शेअर बाजारात अनिच्छितता आणि जोखिम आहे हा मूळ कळीचा मुद्दा आहे . आणि या क्षेत्रातले काहीच ज्ञान नसलेले लोक ही अनिच्छितता आणि जोखिम घेउ शकत नाहीं किंवा पेलू शकत नाहीं यालाच ते लोक जुगार म्हनतात हेच सत्य आहे . आणि ज्या गोष्ठी आपल्या आवाक्याबाहेर असतात त्या गोष्ठींबद्दल तुच्छता बाळगण्याचा मानवी स्वाभाव असतो .
त्यामुळे शेअर बाजाराला जुगार म्हणनार्या लोकांच्या कोल्ह्याला द्राक्षे आंबट ही मानसिकता आपण समझून घेऊयात .
त्यामुळे या पहिल्या वर्गामधल्या लोकांना इतक जास्त सिरिअस घ्यायची काही गरज नाहीं .
.
आता शेअर बाजाराला जुगार म्हणनार्या दुसर्या वर्गाबाबत जानून घेउ...
या वर्गात असे लोक असतात कि ज्यांन कुठलाची अभ्यास न करता शेअर बाजारात अंधाधुंध गुंतवणूक केल्यामुळे कधीतरी तोटा झालेला असतो . त्यामुळे हे लोक शेअर बाजाराच्या नावाने बोटे मोडत असतात .
अभ्यासा न करता घेतलेला कुठलाही निर्णय म्हनजे विमानातून पॅराशूट शिवाय उडी मारण्यासारखाच प्रकार झाला .
कुठल्या क्षेत्रामधले ठोक ताळे , खाचा खळग्या समझून घेण्यासाठी अगोदर त्या क्षेत्राचे सखोल ज्ञान घेउन मगच त्या क्षेत्रामध्ये उतरावे .
मराठीत एक म्हन आहे .
अर्धवट ज्ञानी , तो दु:खाचा धनी .
शेअर बाजारात Delivery किंवा equity , future and option , intraday trading या ३ पद्धतिने व्यवहार केले जातात .
.
आपण equity ( समभाग ) या प्रकारात investment करायची . यांपैकी future and option आणि intraday trading हे प्रकार खुप रिस्की आहेत . नवीन लोक सुरवातीलाच यात घुसतात आणि तोटा झाल्यावर शेअर बाजाराला नावे ठेवतात .
.
जे लोक शेअर बाजारात अर्धवट ज्ञान आणि स्वतःच डोक न वापरता इतरांच्या सल्ल्यावरुन गुंतवणूक करुन पैसा गमाउन नंतर शेअर बाजाराला नावे ठेवतात त्यांना तुम्ही काही प्रश्न विचारा .
१) तुम्ही Delivery किंवा equity , future and option , intraday trading यांपैकी नक्की कशात investment केली होती .
२) तुम्ही ज्या कंपनीने शेअर्स घेतलेले त्या कंपनीवर किती कर्ज होत किंवा त्यां कंपनीने त्यांचे शेअर्स कुठे गहान ठेवले होते का.
३) तुम्ही ज्या क्षेत्रामधील कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती त्या क्षेत्राबद्दल तुम्हाला काही बेसिक किंवा अधिक माहिती आहे का . म्हनजेच त्या कंपनीचा नक्की धंदा काय आहे हे याच ज्ञान तुम्हाला होत का.
४) तुम्ही ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली त्या कंपनीची गुंतवणूक करताना विक्री , नफा आणि प्रॅाफिट मार्जिन तुम्हाला माहित होत का .
५) गुंतवणूक केल्यानंतर नंतरच्या काळात तुम्ही कंपनीन्या विक्री , नफा आणि प्रॅाफिट मार्जिन या वाढत आहे कि कमी होत आहे या गोष्ठींकडे लक्ष दिल का .
६) व्यवसाय करताना कंपनीने स्वतःचे किती पैसे लावलेत आणि किती पैसे उधार घेतलेल या गोष्ठींकडे तुम्ही लक्ष दिलत का..
७) जर कंपनीवर कर्ज असेल तर गेल्या ५-१० वर्षांत ते कर्ज वाढत आहे कि कमी कमी होत आहे याच निरीक्षण तुम्ही केल होत का .
८) कंपनीचा उत्पादन खर्च वाढत आहे कि कमी कमी होत आहे याच निरीक्षण तुम्ही केल होत का .
.
भारतीय शेअर बाजाराचे दार सर्वांसाठी खुले आहे .
शेअर बाजारात जेवढ्या काही कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांच्या मालमत्तेची बेरिज करुन त्यातील गुंतवणूकदारांच प्रमोटर्स , म्युच्युअल फंड , फॅारेन इन्वेस्टर्स , आणि आपल्यासारखे सर्वसामान्य इन्वेस्टर्स यांमध्ये वर्गीकरण केल तर अस लक्षात येइल कि ,
शेअर बाजारातील मालमत्तेपैकी ५०% मालकी हक्क म्हनजेच शेअर्स त्या त्या संबंधित कंपन्यांच्या मालकांकडे म्हनजेच प्रमोटर्स कडे आहेत , १२% शेअर्स LIC आणि इतर इन्सुरन्स कंपन्यांकडे आहेत , सरासरी १३% मालकी हक्क म्हनजेच शेअर्स म्युच्युअल फंड हाउसकडे आहेत , १२% मालकी हक्क म्हनजे शेअर्स हे बाहेरुन आपल्या बाजारात आलेल्या फॅारेन इन्स्टीट्यूशनल इन्वेस्टर्सकडे आहेत , उरलेले फक्त १३% शेअर्स आपल्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे आहेत .
.
पण इथ गंमत बघा ,
ज्यांचे जास्त पैसे शेअर मार्केटमध्ये आहेत त्यांनी अगोदर घाबरायला पाहिजे .
पण त्यांच्यापेक्षा आपल्यासारख्या १३% सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाच पैसे गामावण्याची जास्त भिती वाटते .
.
आर्थिक मंदीमध्ये हजारो सर्वसामान्य लोकांच्या नोकर्या जातात . पण तेच लोक तेजी असताना तेजीचा फायदा करुन घेतात का..??
जर तुमच्या मंदीचा विपरीत परिणाम होत असेल तर मग तुम्ही तेजी असताना हात धुऊन का घेत नाहींत ..??
म्हनजे तेजी असली कि त्याची गोड फळ इतरांनी खायची आणि मंदी आली कि तुम्ही उपासमार करुन घ्यायची हा कुठला न्याय ..??
तुम्ही नुसतेच मंदीमध्ये भरडून जाउ नका तर तेजीमध्येसुद्धा तुम्ही तुमचा स्वतःचा फायदा करुन घ्यायला हवा . तो तुमचा मूलभूत हक्क आणि अधिकार आहे .
त्यासाठी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये एन्ट्री करावीच लागेल .
तुम्ही कमावलेल्या आणि गुंतवलेल्या एका एका पैशाने तुमच्यासाठी काम केल पाहिजे . त्यासाठी काही तरी धंदा व्यावसाय करा किंवा चांगल्या व्यावसायामध्येच गुंतवणूक करुन पार्टनर व्हा . आणि हिच संधि शेअर बाजाराच्या रुपाने आपल्यासमोर हात जोडून उभी आहे .
.
आपण एखाद प्रॅाडक्ट विकत घेताना ग्राहकासारखा विचार करतो . पण आपण तेच प्रॅाडक्ट बनवणार्या एखाद्या कंपनीचेच काही शेअर्स ( समभाग ) विकत घेतो तेव्हा आपण त्या कंपनीचे काही अंशी मालक झालेलो असतो . त्यामुळे या ठिकानी ग्राहकासारखी विचारसरनी न ठेवता मालकासारखी विचारसरनी ठेवायला हवी . यावरच स्टॅाक मार्केट मधल निम्म यश अवलंबून आहे .
.
स्टॅाक मार्केट आपण समझतो तितक अवघड नक्कीच नाही . अगदी मार्केटमध्ये रोज रोज वापरले जाणारे काही इंग्लिश शब्द जेमतेम कळणारा व्यक्तिदेखिल यशस्वी गुंतवणूकदार बनू शकतो .
यासाठी स्टॅाक मार्केटमधल्या ज्ञानाबरोबरच अंगात निर्णय क्षमता , आर्थिक शिस्त , धैर्य , संयम , धाडस असाव लागत तसेच लोभावर नियंत्रण ठेवाव लागत .
मला समझलेल मार्केट म्हनजे २५% सखोल ज्ञान आणि उरलेले ७५% निर्णय क्षमता , आर्थिक शिस्त , धैर्य , संयम , धाडस आणि लोभ या भावनांचा योग्य वापर .

Fundamental analysis - Price to book ratio

P/B ratio ( price to book ratio ) Formula Price to book ratio = Market price of share / book value . यासाठी अगोदर book value म्हणजे काय त...