सोमवार, १४ ऑगस्ट, २०१७

शेअर मार्केटमधील पारदर्शकता...

शेअर बाजारात पैसे बुडतात का..??
आमचे पेसे कोणी खाल्ले तर..??
आम्ही गुंतवणूक केलेली कंपनीच बुडीत निघाली तर..??
.
D-MATE अकाउंट उघडण्याअगोदर सगळ्याच गुंतवणूकदारांच्या मनात हीच शंका असते . एका स्मार्ट इन्वेस्टरच्या  मनात अशा शंका यायलाच हव्यात . आपण घाम गाळून कमावलेला पैसा गुंतवण्यापुर्वी  आपण दहा वेळेस विचार केला पाहिजे .
माझ्याही मनात हीच शंका होती .
.
तुम्ही रिअल इस्टेट मध्ये गुंतवणूक करा , बिल्डर तुम्हाला कुठल्या ना कुठल्या पद्धतिने चुना लावतोच .
तुम्ही सोने खरेदी करा , सोनार विकत घेताना मजुरीचे वाढिव पैसे घेतो . तेच सोने तुम्ही सोनाराकडे विकायला जा , सोनार मजबूत घट लावतो .
गुंतवणूकदारांवर एवढा अन्याय होतो तरी पण गुंतवणूकदार एवढी फसवणूक होउन सुद्धा काहीच करु शकत नाहीं .
इथे गुंतवणूकदार पुर्णपणे हतबल असतो , कारण कायदे आणि सरकारच यांवर इतक ठिक नियंत्रण नसत .
.
आपल्या देशातील सर्व बॅंकावर आणि बॅंकेंच्या व्यवहारांवर रिजर्व बॅंक अॅाफ इंडियाचे ( RBI ) नियंत्रण असते .
RBI ला एखाद्या बॅंकेबाबत काही अक्षेपार्ह निदर्शनास आले तर RBI कडून संबंधित बॅंकेवर तत्काळ कारवाई केली जाते .
एखादी बॅंक तोट्यात असेल तर RBI गुंतवणूकदारांच्या पैशाचा विचार करुन त्या बॅंकेचे दुसर्या एखाद्या बॅंकेत मर्जर करते .
.
तसच शेअर मार्केट मधल्या प्रत्येक कंपनीवर आणि प्रत्येक व्यवहारावर सेबी ( SEBI ) चे नियंत्रण असते .
सेबी म्हनजे काय..??
SEBI म्हनजे Security And Exchange Board Of India... ही एक पुर्णपणे सरकारी नियंत्रण असणारी संस्था आहे .
शेअर बाजारात कंपनी लिस्ट होण्यापुर्वी सेबी कडून त्या कंपनीचे पुर्णपणे Audit केले जाते . कंपनीची पत पाहूनच सेबी कडून कंपनीला शेअर मार्केटमध्ये सामाउन घेतले जाते .
कंपनीला त्यांचे सगळे Audit report , profit loss statement , balance sheet , annual report , quarterly report हे सगळे महत्त्वाचे डॅाक्युमेंट्स गोपनीय न ठेवता ते सर्वसामान्य गुंतवणूकदारांना सहज उपलब्ध व्हावेत या हेतूने जनतेसमोर सादर करावे लागतात .
एक प्रकारे सेबीने कंपन्यांना एवढे कडक आणि जाचक नियमांनी बांधून ठेवले आहे कि कंपनीने प्रमोटर्स , डायरेक्टर किंवा मालक आपल्यासारख्या शेअर होल्डरचे नुकसान होइल असा कोणताच निर्णय घेउ शकत नाहीं . शेअर बाजारातल्या सर्व कंपन्यांच्या व्यवहारांवर सेबी चे नियंत्रण असते . त्यामुळे शेअर बाजारात लबाडी गैरव्यवहार होण्याचे चान्सेस शून्य टक्के असतात . यापेक्षा अजुन किती पारदर्शकपणा हवा..??
.
कंपनी लिस्ट झाल्यानंतर देखिल सेबी कडून कंपन्यांचे वेळोवेळी Audit , enquiry आणि investigation चालूच असते . त्यामुळे  कंपनीच्या डायरेक्टला काही गडबड घोटाळा आणि टॅक्स चोरी वगैरे करता येत नाहीं . जर कुठली कंपनी SEBI ला दोषी आढळली तर गुंतवणूकदारांच्या पैशांचा विचार करुन SEBI कडून संबंधित कंपनीने सगळेच आर्थिक व्यवहार आणि अकाउंट सील केले जातात .
.
शेअर बाजारात पैसे बुडतात का..??
आमचे पेसे कोणी खाल्ले तर..??
तुम्हाला या प्रश्नांची उत्तरे आणि शंका दूर झाल्या असतील .
.
आता दुसरी शंका ,
आम्ही गुंतवणूक केलेली कंपनीच बुडीत निघाली तर..??
.
कंपनी अशी एका रात्रित बंद पडत नसते . कंपनी बंद पडन्याची एक दिर्घकाळाची प्रक्रिया असते .
कंपनी बंद पडन्यामागे प्रामुख्याने दोन कारने असतात .
दिवसेंदिवस वर्षानुवर्षे विक्री कमी होउन कंपनीना शुद्ध नफ्यात घट होत असल्यावर आणि कंपनीच्या कर्जामध्ये सतत वाढ होत असल्यास अशा कंपन्या बंद पडायची दाट शक्यता असते .
आपण अशा कंपन्यांमध्ये गुंतवणूक करायची नाहीं . जरी आपण गुंतवणूक केलेली कंपनी अशा प्रकारची असेल तर आपल्याला तिच्यातून योग्य वेळीच बाहेर पडता देखिल येत .
.
मी वरती सेबी ने शेअर मार्केटमधल्या कंपन्यांना त्यांची सर्व माहिती Quarterly results , annual reports , Balance sheet , Profit loss statment मध्ये लोकांसाठी खुली ठेवने बंधनकारक आहे . आपण या गोष्ठींची पाहनी करुन कंपनीची स्थिती समझाउन घेउ शकतो .
आणि जरी तुमच्या मनात अशी शंका असेल कि कंपनीने financial statements मध्ये काही चुकीची माहिती टाकून गडबड घोटाळा केला आहे . तर अशा वेळी आपल्या लक्षात येण्यापुर्वीच सेबी संबंधित कंपनीवर कडक कारवाई करते . ही कारवाई काही साधीसुधी नसते . सेबी ने काही कंपन्यांना करोडो रुपये दंड भरायला लावला आहे .
.
शेअर बाजारात ७००० कंपन्या लिस्टेड आहेत . आणि आपल्यावर कोणाच बंधन किंवा बळजबरी नाही . आपण आपल्याला हव्या त्या कंपनीची निवड करु शकतो . आपण हव तेव्हा कंपनीमधून बाहेर पण पडू शकतो .
स्टॅाक मार्केट मध्ये फायदा कमावन्याच्या गोष्ठी खुप लांबच्या झाल्या . त्यापुर्वी आपण आपल भांडवल सुरक्षित ठेवल पाहिजे .
त्यासाठी नेहमी ज्या कंपनीच बिजनेस मॅाडेल आपल्याला सहज कळत , ज्या कंपन्यांची विक्री , नफा चांगला आहे , समाजामध्ये पत चांगली आहे आणि ज्या कंपनीवर कर्ज आजिबातच नाहीं किंवा कमी आहे अशा चांगल्या कंपनीची गुंतवणूकीसाठी निवड करावी .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Fundamental analysis - Price to book ratio

P/B ratio ( price to book ratio ) Formula Price to book ratio = Market price of share / book value . यासाठी अगोदर book value म्हणजे काय त...