शुक्रवार, ११ ऑगस्ट, २०१७

मला समझलेल शेअर मार्केट...

शेअर बाजार खरच एक जुगार आहे का ..?? शेअर बाजार म्हंटल कि मराठी माणूस चार हात लांबच उभा राहतो . पण तिकड गुजरात मध्ये जवळपास प्रत्येक घरामध्ये एकाचे तरी D MATE ACCOUNT असते . तिथल्या लहान लहान पोरांना अगदी लहानपणापासूनच मार्केटचे धडे दिले जातात . दोन शेजारच्याच राज्यामाधल्या लोकांच्या मानसिकतेमध्ये इतका विरोधाभास का..??
अस काय आहे कि जे गुजराती लोकांना मार्केटमध्ये दिसत पण ते मराठी माणसाला दिसत नाही किवा मराठी माणूस ते समझून घेण्याची मानसिकता ठेवत नाही .
असो ,
शेअर बाजाराला जुगार म्हनणारे दोन वर्गातले लोक आपल्याला पहायला मिळतात .
.
पहिला वर्ग असा कि ज्यांनी कधी शेअर बाजाराच तोंडदेखील पाहिलेल नाहीं असा . शेअर बाजार नक्की चालतो तरी कसा याबाबत यांना शून्य ज्ञान असत .
हे लोक लहानपणापासून वाडवडिलांच्या तोंडून आणि इतर अज्ञानी लोकांकडून ऐकत आलेल्या ऐकीव माहितीच्या आधारे आपल मत मांडत असतात . जेव्हा जास्त संख्येने लोक एखाद्या गोष्ठीच्या समर्थनार्थ किंवा एखादा गोष्ठीविरुद्ध एकत्र आले कि एक भक्कम जनमत तयार होत आणि आपण एवढे सगळे लोक बोलतायेत तर नक्कीच ते खर बोलत असतील यावर शिक्कामोर्तब करतो . आपल्याकडे एक अलिखित सिद्धांत आहे . लोक म्हनात म्हनुन एखादी गोष्ठ खरी आणि लोक म्हनतात म्हनुन एखादी गोष्ठ खोटी यालाच आपण सर्टिफ़िकेट समझतो .
.
अतिशय ज्ञानी आणि तज्ञ लोकांनासुद्धा हा अज्ञानी समुदाय वेडा ठरऊ शकतो हा भाग वेगळा .
कुठलाही अभ्यास न करता केवळ लोकमतावर एखाद्या सिद्धतेपर्यंत पोहचने हे चित्र काही बरोबर दिसत नाही . जे लोक अकाउंट फिल्डमधले आहेत आणि ज्यांना उद्योग धंद्या व्यापारातल बर्यापैकी कळत अशा अभ्यासू लोकांनी अभ्यासू पद्धतिने चिकित्सा करुन शेअर मार्केट जुगार आहे अस म्हंटल तर मी यावर सहमत असेल . पण या क्षेत्राबाबतीत अज्ञानी लोकांनी मांडलेल्या सिद्धतेला मी कधीच मान्यता देणार नाही .
अज्ञानी लोक शेअर बाजाराला जुगारच म्हनतील आणि शिकले सवरलेले लोक बाजारातल्या जोखिम आणि अनिच्छिततेवर भाष्य करतीत .
शेअर बाजारात अनिच्छितता आणि जोखिम आहे हा मूळ कळीचा मुद्दा आहे . आणि या क्षेत्रातले काहीच ज्ञान नसलेले लोक ही अनिच्छितता आणि जोखिम घेउ शकत नाहीं किंवा पेलू शकत नाहीं यालाच ते लोक जुगार म्हनतात हेच सत्य आहे . आणि ज्या गोष्ठी आपल्या आवाक्याबाहेर असतात त्या गोष्ठींबद्दल तुच्छता बाळगण्याचा मानवी स्वाभाव असतो .
त्यामुळे शेअर बाजाराला जुगार म्हणनार्या लोकांच्या कोल्ह्याला द्राक्षे आंबट ही मानसिकता आपण समझून घेऊयात .
त्यामुळे या पहिल्या वर्गामधल्या लोकांना इतक जास्त सिरिअस घ्यायची काही गरज नाहीं .
.
आता शेअर बाजाराला जुगार म्हणनार्या दुसर्या वर्गाबाबत जानून घेउ...
या वर्गात असे लोक असतात कि ज्यांन कुठलाची अभ्यास न करता शेअर बाजारात अंधाधुंध गुंतवणूक केल्यामुळे कधीतरी तोटा झालेला असतो . त्यामुळे हे लोक शेअर बाजाराच्या नावाने बोटे मोडत असतात .
अभ्यासा न करता घेतलेला कुठलाही निर्णय म्हनजे विमानातून पॅराशूट शिवाय उडी मारण्यासारखाच प्रकार झाला .
कुठल्या क्षेत्रामधले ठोक ताळे , खाचा खळग्या समझून घेण्यासाठी अगोदर त्या क्षेत्राचे सखोल ज्ञान घेउन मगच त्या क्षेत्रामध्ये उतरावे .
मराठीत एक म्हन आहे .
अर्धवट ज्ञानी , तो दु:खाचा धनी .
शेअर बाजारात Delivery किंवा equity , future and option , intraday trading या ३ पद्धतिने व्यवहार केले जातात .
.
आपण equity ( समभाग ) या प्रकारात investment करायची . यांपैकी future and option आणि intraday trading हे प्रकार खुप रिस्की आहेत . नवीन लोक सुरवातीलाच यात घुसतात आणि तोटा झाल्यावर शेअर बाजाराला नावे ठेवतात .
.
जे लोक शेअर बाजारात अर्धवट ज्ञान आणि स्वतःच डोक न वापरता इतरांच्या सल्ल्यावरुन गुंतवणूक करुन पैसा गमाउन नंतर शेअर बाजाराला नावे ठेवतात त्यांना तुम्ही काही प्रश्न विचारा .
१) तुम्ही Delivery किंवा equity , future and option , intraday trading यांपैकी नक्की कशात investment केली होती .
२) तुम्ही ज्या कंपनीने शेअर्स घेतलेले त्या कंपनीवर किती कर्ज होत किंवा त्यां कंपनीने त्यांचे शेअर्स कुठे गहान ठेवले होते का.
३) तुम्ही ज्या क्षेत्रामधील कंपनीमध्ये गुंतवणूक केली होती त्या क्षेत्राबद्दल तुम्हाला काही बेसिक किंवा अधिक माहिती आहे का . म्हनजेच त्या कंपनीचा नक्की धंदा काय आहे हे याच ज्ञान तुम्हाला होत का.
४) तुम्ही ज्या कंपनीमध्ये गुंतवणूक केलेली त्या कंपनीची गुंतवणूक करताना विक्री , नफा आणि प्रॅाफिट मार्जिन तुम्हाला माहित होत का .
५) गुंतवणूक केल्यानंतर नंतरच्या काळात तुम्ही कंपनीन्या विक्री , नफा आणि प्रॅाफिट मार्जिन या वाढत आहे कि कमी होत आहे या गोष्ठींकडे लक्ष दिल का .
६) व्यवसाय करताना कंपनीने स्वतःचे किती पैसे लावलेत आणि किती पैसे उधार घेतलेल या गोष्ठींकडे तुम्ही लक्ष दिलत का..
७) जर कंपनीवर कर्ज असेल तर गेल्या ५-१० वर्षांत ते कर्ज वाढत आहे कि कमी कमी होत आहे याच निरीक्षण तुम्ही केल होत का .
८) कंपनीचा उत्पादन खर्च वाढत आहे कि कमी कमी होत आहे याच निरीक्षण तुम्ही केल होत का .
.
भारतीय शेअर बाजाराचे दार सर्वांसाठी खुले आहे .
शेअर बाजारात जेवढ्या काही कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांच्या मालमत्तेची बेरिज करुन त्यातील गुंतवणूकदारांच प्रमोटर्स , म्युच्युअल फंड , फॅारेन इन्वेस्टर्स , आणि आपल्यासारखे सर्वसामान्य इन्वेस्टर्स यांमध्ये वर्गीकरण केल तर अस लक्षात येइल कि ,
शेअर बाजारातील मालमत्तेपैकी ५०% मालकी हक्क म्हनजेच शेअर्स त्या त्या संबंधित कंपन्यांच्या मालकांकडे म्हनजेच प्रमोटर्स कडे आहेत , १२% शेअर्स LIC आणि इतर इन्सुरन्स कंपन्यांकडे आहेत , सरासरी १३% मालकी हक्क म्हनजेच शेअर्स म्युच्युअल फंड हाउसकडे आहेत , १२% मालकी हक्क म्हनजे शेअर्स हे बाहेरुन आपल्या बाजारात आलेल्या फॅारेन इन्स्टीट्यूशनल इन्वेस्टर्सकडे आहेत , उरलेले फक्त १३% शेअर्स आपल्यासारख्या सर्वसामान्य गुंतवणूकदारांकडे आहेत .
.
पण इथ गंमत बघा ,
ज्यांचे जास्त पैसे शेअर मार्केटमध्ये आहेत त्यांनी अगोदर घाबरायला पाहिजे .
पण त्यांच्यापेक्षा आपल्यासारख्या १३% सर्वसामान्य गुंतवणूकदारांनाच पैसे गामावण्याची जास्त भिती वाटते .
.
आर्थिक मंदीमध्ये हजारो सर्वसामान्य लोकांच्या नोकर्या जातात . पण तेच लोक तेजी असताना तेजीचा फायदा करुन घेतात का..??
जर तुमच्या मंदीचा विपरीत परिणाम होत असेल तर मग तुम्ही तेजी असताना हात धुऊन का घेत नाहींत ..??
म्हनजे तेजी असली कि त्याची गोड फळ इतरांनी खायची आणि मंदी आली कि तुम्ही उपासमार करुन घ्यायची हा कुठला न्याय ..??
तुम्ही नुसतेच मंदीमध्ये भरडून जाउ नका तर तेजीमध्येसुद्धा तुम्ही तुमचा स्वतःचा फायदा करुन घ्यायला हवा . तो तुमचा मूलभूत हक्क आणि अधिकार आहे .
त्यासाठी तुम्हाला शेअर मार्केटमध्ये एन्ट्री करावीच लागेल .
तुम्ही कमावलेल्या आणि गुंतवलेल्या एका एका पैशाने तुमच्यासाठी काम केल पाहिजे . त्यासाठी काही तरी धंदा व्यावसाय करा किंवा चांगल्या व्यावसायामध्येच गुंतवणूक करुन पार्टनर व्हा . आणि हिच संधि शेअर बाजाराच्या रुपाने आपल्यासमोर हात जोडून उभी आहे .
.
आपण एखाद प्रॅाडक्ट विकत घेताना ग्राहकासारखा विचार करतो . पण आपण तेच प्रॅाडक्ट बनवणार्या एखाद्या कंपनीचेच काही शेअर्स ( समभाग ) विकत घेतो तेव्हा आपण त्या कंपनीचे काही अंशी मालक झालेलो असतो . त्यामुळे या ठिकानी ग्राहकासारखी विचारसरनी न ठेवता मालकासारखी विचारसरनी ठेवायला हवी . यावरच स्टॅाक मार्केट मधल निम्म यश अवलंबून आहे .
.
स्टॅाक मार्केट आपण समझतो तितक अवघड नक्कीच नाही . अगदी मार्केटमध्ये रोज रोज वापरले जाणारे काही इंग्लिश शब्द जेमतेम कळणारा व्यक्तिदेखिल यशस्वी गुंतवणूकदार बनू शकतो .
यासाठी स्टॅाक मार्केटमधल्या ज्ञानाबरोबरच अंगात निर्णय क्षमता , आर्थिक शिस्त , धैर्य , संयम , धाडस असाव लागत तसेच लोभावर नियंत्रण ठेवाव लागत .
मला समझलेल मार्केट म्हनजे २५% सखोल ज्ञान आणि उरलेले ७५% निर्णय क्षमता , आर्थिक शिस्त , धैर्य , संयम , धाडस आणि लोभ या भावनांचा योग्य वापर .

1 टिप्पणी:

Fundamental analysis - Price to book ratio

P/B ratio ( price to book ratio ) Formula Price to book ratio = Market price of share / book value . यासाठी अगोदर book value म्हणजे काय त...