सोमवार, २८ ऑगस्ट, २०१७

Fundamental analysis - PE ratio

P/E ratio ( Price to earning ratio )
Formula
P/E ratio = Price / EPS
Example
P/E ratio(10rs)= Price(100rs)/EPS(10rs)
.
समझा एखादी xyz नावाची कंपनी आहे आणि त्या कंपनीचा एक शेअर सध्या १००/- रुपयांना ट्रेड होतोय . आणि त्या कंपनीचा EPS 10rs आहे म्हनजेज ती कंपनी १०० रुपयांच्या एका शेअरवर वर्षभरात १० रुपये शुद्ध नफा कमावते .
याचा अर्थ असाही होतो कि १० रुपये वार्षिक फायद्यासाठी गुंतवणूकदार १०० रुपये म्हनजेच होणार्या संभाव्य फायद्याच्या दहा फट पैसे गुंतवणूक करतात .
सोप्प्या भाषेत सांगतो..
कंपनी जितका शुद्ध नफा कमावते त्याच्या किती पट पैसे गुंतवतो ते प्रमाण म्हनजेच pe ratio ..
गुंतवणूकदारांचा एक वर्ग असा आहे कि त्यांच कल low pe stocks कडे असतो . कारण pe ratio जेवढा कमी तेवढा तो स्टॅाक स्वस्त असा जनरली सगळ्यांच समज असतो .
हा समज असायलाच पाहिजे . पण एखादा स्टॅाक इतक्या कमी pe ratio वर का ट्रेड होतो यामागे पण बरिच कारणे असतात .
.
गुंतवणूकदारांचा दुसरा एक वर्ग असा आहे कि त्यांच कल  high pe stock कडे असतो .
त्या लोकांचा असा logic असत कि मार्केट मध्ये या high pe stock ने स्वतःला सिद्ध केलय . कंपनीचा growth rate चांगला आहे आणि एकंदरीत त्या कंपनीने गेल्या काही वर्षांत अतिशय उत्तम कामगिरी करुन गुंतवणूकदारांचा विश्वास संपादन केलाय आणि मार्केट मध्ये पत कमावली आहे .
.
तस पाहिल तर प्रत्येक सेक्टरच pe ratio वेगवेगळे असतात .
जस कि power sector मधल्या  स्टॅाक्सचा pe ratio low म्हनजेच सरासरी  10 ते 15 असतो .
यामागच कारण म्हनजे या सेक्टर मध्ये गुंतवणूकींसाठी पैसा भरपूर लागतो . त्यामुळे या सेक्टरमधल्या कंपन्यांवर कर्ज भरपूर असते .
याशिवकय वीजेचे दर सरकार ठरवत असल्यामुळे या सेक्टरमधल्या कंपनी स्वतःच वीजेचे दर वाढऊ किंवा ठरऊ शकत नाहीं परिणामी कंपन्यांच्या EPS म्हनजेच कमाईमध्ये मध्ये अपेक्षित झटपट वाढ होत नाहीं .
.
FMCG सेक्टरमधल्या कंपन्यांचा PE ratio high असतो .
FMCG ( fast moving consumer goods रोज वापरल्या जाणार्या वस्तु )
यामागच कारण म्हनजे या कंपन्यांच्या मालाला खुप जास्त असतो . या कंपन्याच्या उत्पादनच्या किंमती ठरवण्यावर सरकारच जास्त control नसत .
.
सेक्टरमधल्या सगळ्या स्टॅाकच्या Pe रेशोंची सरासरी घेउन प्रत्येक सेक्टरचा एक industry PE काढला जातो.
गुंतवणूकदार निवडलेला स्टॅाक industry pe ratio बरोबर तुलना करतात आणि एकाच सेक्टरमधल्या ४-५ कंपन्यांची एकमेकांबरोबर तुलना करुन low pe stock निवडतात .

1 टिप्पणी:

Fundamental analysis - Price to book ratio

P/B ratio ( price to book ratio ) Formula Price to book ratio = Market price of share / book value . यासाठी अगोदर book value म्हणजे काय त...